STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

3  

Varsha Shidore

Inspirational

रंग स्वप्नांच्या गंधाचा...

रंग स्वप्नांच्या गंधाचा...

1 min
303

छंद माझा येऊनी स्वप्नात 

आलिंगन मला अलगद देतो 

रंग माझा दिव्यात वेगळा 

मला स्वतःत काहीसा गुंतवतो 


ध्येयवेडे जग माझ्या लेखणीचे 

लावते श्वासरुपी लळा मजला 

रंग माझा शब्दांचा वेगळा 

रम्य निजवतो छंदात मजला 


डगमगत्या तीरावरती गाठूनी 

पडता पडता हिंमतीने सावरतो 

रंग माझा धैर्याचा असा वेगळा 

स्वप्नात मला स्पर्शून वेडा जातो 


आनंदाचे क्षण मनसोक्त उधळूनी 

जीवनाचे उद्दिष्ट रंगीन खुलवतो 

रंग माझा स्वप्रेमाचा आगळा वेगळा 

स्वतःसाठी जगण्याचा गंध दावतो 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational