STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

रम्य ते बालपण

रम्य ते बालपण

1 min
155

बालपणीचा काळ सुखाचा

खेळ , गप्पागोष्टी रंगण्याचा

निर्व्याज मन , निर्मळ गप्पा 

चिंचा , बोरे , आवळे खाण्याचा 


हसू ओठावरी अल्लडसे

मन निर्मळ ते धवलसे

आगळीच दुनिया रमवे

जाण दुनियेची मुळी नसे


नसे शिरी ओझे अभ्यासाचे

हुंदडणेच माहित असे

मैत्रीची रीत आगळी असे

जिवश्चकंठश्च मैत्री असे


गोष्टी चांदोबा , परीराणीच्या

अल्लाउद्दीन जादूदिव्याच्या

गोष्टी ऐकता स्वप्नकथांंच्या

रंग चढे नव कल्पितांच्या


निखळ आनंद बालपणी

आता उरल्या त्या आठवणी

गेले ते दिन गेले म्हणूनी

आठवांतचि जाते रमूनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract