STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

रक्षाबंधन....!

रक्षाबंधन....!

1 min
28.9K


रक्षा बंधन...!!


अरे रे आज रविवार

रक्षाबंधन आणि आज सुट्टी

आता आठवतो मला तो

रक्षा बंधनाचा सण

शाळेत असताना


सण वार,जयंत्या पुण्यतिथ्या

वगैरे रविवारी आल्या की

अगदी दुदैव वाटायचं

कोणीतरी पेन्सिल काढून

घेतल्याचं दुःख व्हायचं

तसच आज काहीतरी झालं

पण काय आता सुट्टीच सुट्टी

ती ही नकोशी वाटणारी


मला आठवत

शाळेतलं रक्षाबंधन पार पडलं

आणि मी घरी आलो

दोन्ही हात राख्यांनी पूर्ण भरलेले

घरी बाबा सोफ्यातच बसलेले

त्यांनी पाहिलं आणि


आईला एका दमात हाक मारली

कुसुम कुसुम हे बघ

कार्ट कसं हात सजवून आलंय

तेंव्हा मला काही कळाल नाही

पण रक्षाबंधनाला


मात्र दांडी सुरू झाली

परंतु दैव कसे असते ते मला

कालांतराने कळाले

जेंव्हा त्यागाने मनात हळू हळू घर केले

सगळ्यांचाच मामा बनत गेलो


आणि शेवटी मामा म्हणजे काय

याचीही अनुभूती आली

आता प्रश्न असा पडतो

माझ्या बहिणी इतक्या कमजोर आहेत का?

नाही ,खरच त्या कमजोर नाहीत

त्या कोणालाही सहज मामा करू शकतात


पण बंधन खूप मोलाचं

ते मग कोणतंही असो

त्यात एक प्रेमाचा गोडवा आहे

आपुलकी आहे,भावना आहे

समर्पण आहे,त्याग आहे


एकमेकाच्या संरक्षणाची हमी आहे

आधार आहे ,समाधान आहे

सौख्य आहे, शांती आहे

किंबहुना सर्व काही आहे


म्हणून रक्षाबंधनाचा सण

खूप आता मला आवडतो

जो प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी

एक नवी घट्ट स्नेहाची मायेची

रेशीम गाठ घट्ट बांधतो आणि


एक अतूट नातं कायमच जोडतो

जे आजन्म आधारामय होऊन

सदैव चिरंतन चीरंजीव अमर राहतं..

खूप खूप छान वाटतं....!


सर्वांना रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational