STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
48

राखीचा हा बंध प्रेमाचा, 

प्रेम आहे भावा-बहिणीचा। 

रेशमाच्या धाग्यांनी बांधून त्याला, 

नात्यांचा हळूवार स्पंदनाचा॥ 


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, 

भावास असेल बहिणीची साथ। 

कशीही परिस्थिती आली तरी, 

असेल दोघांचा हातात हात॥ 


दूर असूनही या दिवशी, 

लहानपणीचे दिवस आठवतात। 

हातातल्या राखीला बघून, 

ताईचे प्रेम मनी साठवतात॥ 


प्रेमाचं प्रतिक आहे राखी, 

त्यात भावा-बहिणीचे प्रेम आहे। 

बहिणीच्या रक्षणार्थ सदा, 

भावाचे जीवन सज्ज आहे॥


भावाच्या सुखाची व दिर्घायुष्याची, 

कामना नेहमी बहिण करते। 

रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला, 

बहिण अगणित शुभेच्छा देते॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational