रक्षाबंधन....
रक्षाबंधन....


आन बान शान आज राखीचा मान.....
ठेऊन त्याची जाण....
बहीण भावाच्या नात्याचा
करुनी सन्मान.....
एक अतुट नातं विश्वासाचं
तुझ्यातल्या प्रेमाचं,
भरुन आलंय आनंदाच्या या क्षणी...
बांधतो राखीचा पवित्र धागा
रक्षाबंधनाच्या या दिवशी....
सण हा प्रेमाचा आपुलकीचा
यावा घरोघरी....
बहीण-भावाचं हे नातं अपंरपार जपावं....
हेच मागणे देवाकडे आता दोघांना आयुष्यभर सुखी ठेवावं....
प्रेमाचे हे बंधन कधी ना तुटावे....
मनोमनी सदैव स्मरणात राहावे......
नात्यांच्या या बंधनात....
बहीण-भावाचं एक अनमोल नातं....
क्षणोक्षणी हर्ष बहरत राहावा....
असा या आनंदाचा सदोदीत वर्षाव व्हावा....
रक्षाबंधनाच्या या मंगलमय प्रसंगी....
बंध जुळावे जन्मोजन्मीचे....
प्रेमाचा हा सागर साता समुद्रापार न्यावा....
ना भुतो ना भवती असा
तो सोहळा व्हावा.....
चंद्र सूर्य तारेही असतील साक्षीला....
बहीण-भावाच्या या नात्याचा दिवा कधी ना विझावा....
पौर्णिमेचा चंद्रही त्याच्यासमोर
फिका पडावा.....
पौर्णिमेचा चंद्रही त्याच्यासमोर फिका पडावा....