रक्षा बंधन
रक्षा बंधन
रूसून बसली बहिणाबाई ,
अबोला तिचा काही संपत नाही ....
सुनी भाऊरायाची कलाई ,
ओवाळणीला कोणी वालीच नाही !!
खोडी काढून मला रडवतो ,
तुझ्याशी कधी बोलणार नाही ...
माहित आहे मला दादुल्या ,
राखी तुला कोणीच बांधणार नाही !!
लाडी गोडी जरा लावली ,
बहिणाबाईंची कळी खुलली ...
राखी बांधून भाऊरायाची ,
पुन्हा भांडाभांडी चालू झाली !!
सण हा बहीण भावाचा ,
भांडून ही व्यक्त होतो जिव्हाळा ...
धागा राखीच्या बंधनाचा ,
आजन्म रक्षणाच्या वचनाचा !!
