रंगमंच हा आयुष्याचा !
रंगमंच हा आयुष्याचा !
आयुष्य आहे एक रंगमंच,
सगळेच इथे कलाकार ...
सुख दुःखाच्या नाटकाचा ,
रोज घडतो आविष्कार !!
पाप पुण्य विकते इथे ,
गरिबीचा भरतो बाजार ,
रंग लपती इथे मनाचे ,
मुखवट्याचा खोटा भार !!
मानवतेचा सट्टा लागतो ,
नैतिकतेचा बुरखा फाटतो ...
नित्य नव्या नाटकाचा ,
एक एक अंक साकारतो !!
अंधारात भरतो मेळा ,
झगमगणाऱ्या ताऱ्यांचा ...
रोज निखळतो उगवणारा ,
एक मोहोरा माणुसकीचा !!
रंगमंच हा कठपुतल्यांचा ,
भावरंग हा इथे कोरडा ..
हास्याच्या बुरख्यात दबला ,
मूक अश्रू वेदनेचा !!