STORYMIRROR

Savita Tupe

Romance

3  

Savita Tupe

Romance

प्रेम !!

प्रेम !!

1 min
250

प्रेम म्हणजे दुसरं काय असतं ?

तुझं नी माझं गोड गुपित असतं !

तुझं हसणं , तुझं दिसणं ......

तुझ्या स्वप्नात गुंग होत असतं !!

        भेटीसाठी मन अधीर असतं ,

        भेटल्यावर भान हरवून बसतं !

         तू गेल्यावर त्या आठवणीत ......

         विरह व्याकूळ होत असतं !!

तुझ्या नि माझ्या मिलनाचं ,

मधुर स्वप्न फुलत असतं !

स्वप्नांच्या ही पलीकडलं हे .......

प्रेमाचं गाव बहरत असतं !

         प्रेम म्हणजे अजून काय असतं ?

         दोन शरीर एक मन असतं !

         जिवाभावाचा एकच सखा ....

         असणं खुप भाग्याचं असतं !!

     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance