Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Tupe

Classics

3  

Savita Tupe

Classics

श्रावण आला .

श्रावण आला .

1 min
185

घन निळा हा नभी दाटला ,

रिमझीम बरसल्या श्रावणधारा ,

गंधाळला हा कुंद कुंद वारा ,

ओथंबून हा श्रावण आला .... !!१!!

मोर नाचला फुलवून पिसारा ,

ओसंडून वाहती शुभ्र जलधारा ,

निसर्गात हिरवा साज बहरला ,

इंद्रधनूचा अलौकिक नजारा ... !!२!!

श्रावणात पूज्य शिवआराधना ,

अष्टमीला भरतो गोपाळकाला ,

झिम्मा फुगडीचा खेळ पंचमीला ,

घागरी फुंकती मंगळागौरीला ... !!३!!

व्रत वैकल्ये घेवून आला ,

रूढी परंपरा जपण्यास आला ,

सण समारंभाची वर्दी घेवून , 

श्रावणाचा हा दुत आला ...    !!४!!

निसर्गाला खुलवित आला ,

कविमनाला भुलवित आला ,

चोहीकडे चैतन्य पसरवण्या ,

मनभावन हा श्रावण आला !!  !! ५ !!

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics