मैत्रीचा कट्टा .
मैत्रीचा कट्टा .
1 min
115
नव्याने पुन्हा भरला ,
आज मैत्रीचा हा कट्टा ...
जुन्याच उजळणीच्या ,
मनसोक्त झाल्या गप्पा !!
बालपण हे नव्याने ,
पुन्हा फिरून आले ...
पन्नाशीच्या उंबरठ्यावर ,
मन चिरतरुण झाले !!
पुन्हा पुन्हा भरावा ,
मैत्रीचा हा मेळावा ...
मावळतीच्या सूर्यालाही ,
उदयाचा भास व्हावा !