साद निसर्गाची
साद निसर्गाची
1 min
199
मावळतीचे रंग सोनेरी ,
अलवार पसरले आकाशी !
रवीरूप मनोहर क्षितिजाशी ,
ढगांवर उधळण रंगांची !!
नभातला हा अलौकिक नजारा..
ढगाआड हळूच भास्कर लपला ,
लपंडाव किरणांचा रंगला ....
हरखून पहावा अनोखा सोहळा !!
तोच उदय अन अस्तही तोच ,
तीच धरा रविकिरणही तोच ...
नयनरम्य तो खेळ पाहण्या ..
भुरळ मनाला पाडतो रोज !!
हिरवाईने धरा ही सजते ,
लेवून फुलांची फुलवारी ...
डोळ्यांचे ही फिटते पारणे,
पाहून निसर्गाची नवलाई !!