STORYMIRROR

Savita Tupe

Romance

3  

Savita Tupe

Romance

ती कोण?

ती कोण?

1 min
208

कोण होती माहित नाही ,

पण मनापासून आवडलेली ...

नजरेच्या एका भेटीनेही ,

मनात घर ती करून गेली !

        आली अशी वाऱ्यासारखी ,

        झुळूक बनून स्पर्शून गेली .....

        झलक तिची बघण्यासाठी ,

         वेड जीवाला लावून गेली !

झुरतो फक्त तिच्यासाठी ,

कधी भेटेल कळत नाही ....

प्रेमाची वावटळ उठवून मनी,

रहस्यमय ती होवून गेली !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance