Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Tupe

Inspirational

3  

Savita Tupe

Inspirational

माझा भारत महान

माझा भारत महान

1 min
150


उंच उंच लहरतो तिरंगा ,

वंदन त्याला त्रिवार आहे !

स्वतंत्र देशा ,भारत देशा ,

तू भारतीयांची शान आहे !!


    इथे नांदल्या असंख्य भाषा ,

    सर्वधर्म समभाव आहे !

    हिंदू मुस्लिम शिख ईसाई ,

    विविधतेने देश नटला आहे !!


इथे तळपली तलवार शिवबाची ,

झाशीने बलिदान दिले ,

क्रांतिवीर ही फाशी गेले !

हा रक्त रंजीत इतिहास आहे !! 


    आयुष्य वाहिले शुर वीरांनी ,

    माथी रक्ताचा टिळा आहे !

    सुवर्णाक्षरात नाव कोरूनी ,

    देशभक्त अजरामर आहे !!


शूर विरांची गाथा मोठी ,

प्रत्येकाच्या हृदयात आहे !

इथे वाहतो मनामनामध्ये ,

देशप्रेमाचा वेडा ध्यास आहे !!


  विविधतेने नटलेली ही ,

  धरणी सुजलाम सुफलाम आहे !

  स्वतंत्र देशात आज सुखाने ,

  हा देशवासी नांदतो आहे !!


नागरिक मी या देशाचा ,

हा सार्थ अभिमान आहे !

वंदन करतो भुमातेला ,

माझा भारत महान आहे !!


           !! वंदे मातरम् !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational