संकल्प !!
संकल्प !!
1 min
164
नववर्षाच्या सुरवातीला ,
संकल्प केला मीही मनाशी ...
जगेन म्हणलं मीही आता ,
फक्त माझ्या स्वार्थासाठी !
भरून गेलं नामुष्कीचं,
अनुभवांचं गाठोडं पाठी ...
जुने जाणते सांगून गेले ,
अपुले ओझे आपल्यापाशी !
आपल्याच माणसांनी दिल्या ,
भळभळत्या जखमा हृदयावरती ...
निःशब्द या भावना विरल्या ,
गोठल्या वेदना अपुल्या ओठी !
नकोच कोणी सगेसोयरे ,
नको त्या बंधनाच्या गाठी ..
बदलेल माझी जगरहाटी ,
जगेन मी फक्त माझ्यासाठी !!