माझी आई !!
माझी आई !!
किती गाऊ गुणगान तिचे ?
किती बांधू कौतुकाचे इमले ?
कठोर कधी ती कोमल भासे ,
स्त्रोत वाहे निर्मळ मनीचे !
ना वाहिले ओझे दुःखाचे,
नाही कधी सुखाने हुरळले ...
हास्यवदनाचे ओढून मुखवटे ,
दुःख,वेदना निगुतीने लपवले ?
समजूनही कधी न उमगली ,
ना तिची महती कळली .
स्वतःमध्ये परिपूर्ण अशी ही ,
ती तर माझी आई होती !!