रायगड
रायगड
महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी
कोकण असे किल्ल्यांचे आगर
सह्याद्रीच्या रांगा पासून
थोडा अलिप्त राहून
आभाळाशी जणू स्पर्धा करतो किल्ला हा रायगड
कणखर बलाढ्य अजिंक्य असे याचे स्वरूप
अफाट झाडी, अफाट दरी, साथ अफाट पाण्याची
इतिहास जागवती शूर मराठ्यांचा
राजधानी असे ही स्वराज्याची
सार्थकी होते जीवन चढता रायगडाचा पाया
बघता सुवर्ण सिंहासन
स्मरण होतात
आपले शंभू शिवराया
गड, किल्ले हिरकणी बुरूज
साक्ष देतात विलक्षण पराक्रमाची
प्राणपणाने झुंजले सारे रयतेच्या स्वराज्यासाठी
शिळा शिळामधूनी नाद दुमदुमती
थोर यशोगाथा सांगे मावळ्यांची
त्रिखंडात गाजते
शिवछत्रपतींची ख्याती
तव कीर्तीची पोवाडे आजही शाहीर गाती
स्वराज्य सुखात नांदत, होते अनेक धर्म जाती
सदैव स्मरितो तुम्हा दुर्गपती
प्रिय असे आम्हाला
रायगडाची पवित्र माती
सह्याद्रीच्या घाटामधूनी
मन झुजंते ध्येर्याशी
स्वाभीमानाने छाती फुगते रायगडाच्या पायथ्याशी
विसावला रायगडी
स्वराज्याचा राणा
तव शौर्यामुळेच ताठ आहे आज मराठी बाणा
प्रजारक्षणासाठी बांधले गड-किल्ले शिवबाने
नव्या पिढीला ज्ञान देण्यासाठी करू या
संरक्षण व संवर्धन गड किल्यांचे अभिमानाने🙏🙏
