STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

5.0  

Shila Ambhure

Inspirational

रात्र पौर्णिमेची

रात्र पौर्णिमेची

1 min
27.8K


रात्र पौर्णिमेची सजली ही अशी

नववधू रुपेरी साजात जशी.


शरदाचे चांदणे पडले शुभ्र

याच रंगी रंगले आकाशी अभ्र.


दूध आटवूया चंद्रप्रकाशात

प्रतिबिंब पाहुया चंद्राचे त्यात.


करू जागरण गाऊ उल्हासात

खेळ खेळू टिपऱ्यांचा आनंदात.


चंद्र रोजचा तरी भासतो नवा

मज प्रकाश शीतल त्याचा हवा.


कोजागिरी करू साजरी हर्षाने

आश्विनाची पौर्णिमा आली वर्षाने.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational