रात्र ही गैर झाली
रात्र ही गैर झाली
मावळते झाले नारायण
सांज वात सजली
थकलेल्या देहाची सारी
अंथरुणात निजली
ओथपोथ भरलेल्या देहाची
रात्र ही गैर झाली
तिच्या भावनांचा फक्त
तोच एक वाली
विसरून टाकावे सारे
शांत या वातावरणात
विसावलेल्या देहाची
भूक ठेवावी स्मरणात
