राष्ट्र संत
राष्ट्र संत
1909 वैशाख शुद्ध सप्तमीला
माता मंजुळाबाईच्या
पोटी रत्न जन्मला
अमरावती जिल्हातील यावली या ठिकाणी
"माणिक "नामकरण झाले
बंडोजी रावांचे घर ते पवित्र
माता असे भाग्यवंत
झाला आनंद सर्वत्र
लाभले आडकोजी
महाराजाचे सानिध्य
नाव ठेवले तुकडोजी
दया करूणा वसे त्याच्या पोटी
दीन वंचितासाठी
धर्म जगायचा शिकवी हा संत
खंजिरीवर भजने गाई
लोक होई तृप्त
ग्रामोन्नती व ग्रामकल्याण
हाच मनी ध्यास
गाव गाव अनवाणी फिरून
अंधश्रद्धा निर्मूलन जातिभेद निर्मूलन करण्यासाठी धरली कास
जातिभेद मिटवायला बंधुभाव उजळायला
भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे केला वापर
"ग्रामगीता" या काव्यातून मांडले आत्मसंयमनाचे विचार मोझरी येथे केला "गुरूकुंज "आश्रम स्थापन
लढा स्वातंत्र्याचा दिला सकलजनांना करण्यास ज्ञानी
अनेक भजन, ग्रंथ लिहून अध्यात्मिक सामाजिक
राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार
केला महाराजांनी
मराठी व हिंदी भाषांमध्ये केली काव्यरचना
समाजाचे प्रबोधन करता मिळाली
" राष्ट्रसंत" ही उपाधी
देव माणसांत पाहीला,
महाराष्ट्राचे नाव लौकिक केले आपल्या कर्तुत्वानी
आधुनिक संत, कवी, समाजसुधारक
तुकडोजी महाराज माझे अभिवादन असे तुमच्या चरणी 🙏
