STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

3  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

रानपरी

रानपरी

1 min
644



डोंगराच्या ओंजळीतून वाहे

झुळझुळणारा झरा

सखे तू लावण्याचा मळा धृ


भाकरीचा वानं तुझा गं

सावळा जोंधळा

कमळं भासे नयन तुझे अन्

मयूरं कमानी गळा..


शिंपले गाठली गळसरी सुंदर

गोंदणं कपाळी टिळां

उभार तनूवर वस्त्र शोभले

करदौंडीचा तुरा..


अधरा वरती कोयल बसली

मंजुळ वाजे शीळां

पैंजण पायी वेली नटली

बाहू बांधल्या कडां...


रुपं न्याहळतांना शब्दं फुटेना

रानपरीची तऱ्हा

चाफ्याची ल्याली कर्णफुले अन्

लाज झाकतो विडा..


नखशिखांत वसंत फुलला

मोत्यांचा पडला सडा

किती वर्णावे रुपं तुझे गं

निसर्ग भासे खुळा


सखे तू लावण्याचा मळां..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational