राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ
स्वराज्याची तु जननी
लेक तु गं जाधवांची
शुरवीर पराक्रमी
वीरपत्नी भोसल्यांची ।।१।।
भडकली ती चिंगारी
मशाली त्या पेटलेल्या
स्वराज्य संकल्पनेच्या
नव्या पहाटा उगल्या।।२।।
स्थापन केले मराठी
साम्राज्य महाराष्ट्रात
मांसाहेब जिजाऊंचा
ऐसा पुत्र या भुमीत ।।३।।
घडविला शुरवीर
पुत्र या वीरमातेने
तेजस्वी पराक्रमी या
शुर रणरागिनीने।।४।।
गुलामगिरीच्या बेड्या
तोडूनी नित्य झुंजले
छेडूनी रणसंग्राम
कैकांना स्वतंत्र केले ।।५।।
धन्य धन्य मांसाहेब
घडविला तु विधाता
कोटी कोटी आपणांस
मुजरो हो राजमाता ।।६।।
