व्यथा वसुंधरेची
व्यथा वसुंधरेची
केली मानवा तु रे निसर्गावर चढाई
मारतोस काय भल्या भल्या बढाई
सर्वत्र केलेत घाणींचेच ढिगारे
कारखान्यांतुन निघे विषारी धुराडे
खोखला आतुन दिवसेंदिवस बनतोय
घातक हवेमुळे त्रस्त दम्याने होतोय
एकापाठोपाठ महामारींना आमंत्रित करतो
विळख्यात सापडूनी जीव गमवतो
कुऱ्हाडीच्या घावाने जंगल नष्ट करतो
असंख्य निस्वार्थी पाखरांचे घर तोडतो
सिमेंटच्या गल्ल्या झाल्यात सर्वीकडे
उंच इमारती उभारल्या जिकडेतिकडे
पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात आले
प्रदुषणामुळे सजीवांचे स्वास्थ बिघडले
सांडपाणी महाकाय सागरात सोडले
जलचरांचे अस्तित्व तु हिरावूनी घेतले
तुज स्वार्थासाठी डोंगर -दऱ्या पोखरतो
धरत्रीच्या पोटात खोलवर छिद्रे पाडतो
विषारी वायुंनी वसुंधरेचा जीव घुसमटतो
मानवी दुष्कृत्यामुळे सजीव डगमगतो
उग्र रुप घेवूनी वाढे धरत्रीवरी तापमान
पडतील खाक सारे ओसाड रान
अन्न ,वस्त्र निवारा देयी माता वसुंधरा
तीची जान आता तरी ठेव तु रे मानव नरा
