(पोवाडा) दादासाहेब बिडकर
(पोवाडा) दादासाहेब बिडकर
आधी नमन महापुरुषांना
साधुसंताना,आईसाहेब जिजाऊंना
मुजरा करते शिवरायांना
नमन शंभुराजेंना, महात्मा गांधीना
अभिवादन करते दादासाहेबांना......
एकोणावीसे दहा सालाला
एकोणावीस मार्चचा दिस उजाडला
मल्हाराव पार्वतीच्या पोटी रत्न जन्मला
कोल्हापुरातील तासगावाला
करण्या उद्धार जन्म झाला ....
तेजस्वी बालक आठ वर्षातले
गावोगावी सर्कश करु लागले
पिंजऱ्यातुन वाघाला सोडविले
वाघाशी बालक झुंजू लागले
आ' वाघ्याच्या जबड्याचे वासले
प्रेक्षकांनी श्वास रोखीले .....
सर्कशीचा डाव मोडिला
शिक्षणाचा ध्यास धरीला
कोल्हापुरातील राजाराम हायस्कुला
शिक्षणाचा बेत आखला
बालपणीच काळ कसोटीचा गेला.....
अहो एकोणावीसे एकोणतीसमध्ये
मद्रासच्या युनिवर्सिटीमध्ये
निजाम काॅलेजमध्ये
प्रवेश घेतला सायन्समध्ये .....
देशभक्तीची मशाल पेटली
स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली
राष्ट्रोधाराची कास धरली
विनोबा भावेंकडुन प्रेरणा मिळाली
गांधी तत्वज्ञानाची मुल्ये रुजली .....
कार्यक्षेत्रासाठी नाशिक निवडलं
नाशिकातील बागलाण घेतलं
बागलाण तालुकी केंद्र निश्चित केलं .....
एकोणावीसे सदोतीस सालाला
तेवीस जुन रोजाला
डांग मंडाळाची स्थापना केली
उंबरठाणाला पहिली आश्रम शाळा काढली....
आदिवासीयांचे सेवक आपण
दलितांचे मित्र हो आपण
गोरगरिबांचे कैवारी हो आपण
डोंगरवस्ती ज्ञानाची गंगा आणणारे आपण
सर्वांचे लाडके दादा हो आपण ....
समाज शिक्षण हा अपुला श्वास
बहुजन उत्थानाचा हो अपुला ध्यास
शोषितांविषयी कळकळीची आस
समाजाचा सर्वांगीण विकास हा अपुला प्राण ......
आदीवासी बांधवासांठी ,
दिनदुबळ्यासाठी लढले
अन्यायाच्या विरोध करत राहिले
मागासवर्गीयांच्या हक्कासांठी झटले
दिनदुबळ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लढले
डांग सेवामंडाळासाठी आयुष्य खपले....
अखेरीस दोन हजार पाच साली
बारा मार्चच्या दिवशी
काळाने चाल केली
हळहळ सर्वांना लागली
दादासाहेबांची बातमी कानी आली
कर्मवीर महामानवाची प्राणज्योत मावळली
अश्रु ना अनावर झाली ......
