STORYMIRROR

swapna borse

Inspirational Others

4  

swapna borse

Inspirational Others

जीवणाचे गाणे

जीवणाचे गाणे

1 min
344

जीवनाचे गाणे

कण्हत का म्हणावे

आनंदमयी राहूनी

हसतमुखाने गावे।।१।।


विसरुनी दुःख 

सुखाने नांदावे

स्वच्छंदी होवूनी

मनसोक्त बागडावे।।२।।


रिकाम्या हातांना

सदा काम लावावे

कष्टमयी जीवन

जगूनी कार्यात गुंतावे।।३।।


 दिवसेगणिक नित्य

 ज्ञान आत्मसात करावे

 कागदावर उतरवूनी

लिहूनी पाहावे ।।४।।


महापुरुषांचे विचार

डोळ्यासमोर ठेवावे

वाचूनी यशोगाथा

आदर्शवादी वागावे ।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational