घे उत्सुंग भरारी
घे उत्सुंग भरारी
तु जगतजननी ,हृदयसम्राटनी
तु शालिनी ,रणरागिनी
झुकून मुजरा करते हो
प्रत्येक स्त्रीला.......
दाखव त्या पुरुषांना
आहे तुही दैदीप्यमान
स्त्री जन्मा आली तु
किती आहेस भाग्यवान ....१
जागव तुझ्यातले धाडस
अन् संकटाना सामोरे जा
पेटवूनि तुझ्यातली मशाल
स्त्रीशक्तीचा जागर करत जा....२
नको शरण कुणापुढे जावू
तूही आहेस धैर्यवान
गौरव होतो तुझ्या शक्तीचा
किती आहेस तु सामर्थ्यवान.....३
पलटव इतिहासाची पाने
आठव शौर्य लक्ष्मीबाईचे
साहस त्या काळातले
किती होते हो रझियाचे....४
जव जव होतो अत्याचार
घे रौद्र रुप तु कालिकाचे
भडकव तुझ्यातली चिंगारी
अन् कळू दे शौर्य स्त्रींचे.....५
घे उत्सुंग गगनभरारी
पोहचू दे नजरा तुजपर्यंत
तुझ्या यशाचा डंका गं
घूमु दे दाहि दिशापर्यंत.....६
