क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
नाव मुखी तुझे घेता
आम्हां सावित्री दिसते
सदैव ऋणी राहुनी
चरणी माथा ठेवते ।।१।
क्रांतीची ज्योत बनूनी
ज्ञानाची गंगा आणली
अंधकार मिटवूनी
योग्य दिशा दाखवली ।।२।।
सनातनांचा विरोध
झेलूनी ध्यास धरीला
स्त्रीशिक्षणाचा विडा हा
सावित्रींनी उचलला ।।३।।
हातात लेखणी आली
सावित्रीच्या कार्यामुळे
साक्षर झाल्या महिला
तुझ्याच गं यशामुळे ।।४।।
संकटाशी लढूनिया
पहिली शाळा काढली
नवजात मुलींसाठी
आश्रम तुम्ही बांधली ।।५।।
अंधारलेल्या या वाटा
प्रकाशल्या हो तेजाने
ज्ञानरुपी दिप लागले
घरोघरी स्त्रीशिक्षणाने ।।६।।
स्त्रीवादाची तु जननी
आमची सावित्री झाली
आम्हां सार्या लेकींची गं
शिक्षण दाता बनली ।।७।।
