ब्लाॅक नावाचा कप्पा
ब्लाॅक नावाचा कप्पा
1 min
186
ब्लाॅक नावाच्या एका
कप्प्यात सहज टाकतो
भावनांशी खेळूनी
विषय खल्लास करतो
क्षणिक हो आपला
राग विपरित करतो
शांत मनाने मनाला
प्रश्न विचारु पाहतो
मी काय केले हे
किती होता तो बिचारा
का म्हणुनी नतंर चिंतावे
आपल्याच मनाला विचारा
हृदयाला हादरवूनी
जाणुन बुजुन करणारा
भावनांशी खेळून हो
क्षणात नाते तोडणारा
आयुष्याच्या प्रवासात
अनोळखी प्रवाशी येतात
जीवनाला धडा शिकवूनी
आयुष्यातुन निघून जातात
