STORYMIRROR

swapna borse

Inspirational

3  

swapna borse

Inspirational

सैनिक

सैनिक

1 min
310

शौर्याच्या पताका घूमे

दाहिदिशात विरांच्या

विजयाची यशोगाथा

किती गावू सैनिकांच्या


प्राणांपेक्षा प्रिय सदा

प्रियतम भारतभूमी

लाभले भाग्य ऐसी

पवित्र हि मायभूमी


येता संकट धावती

पुढे सारे शुरवीर

सदैव रक्षा करण्या

तत्पर राहती वीर


घरादाराला सोडूनी

सिमेवरी ‌राहतात

झेलुनीया संकटांना

देशासाठी जगतात


 फडकतो हा तिरंगा

सैनिकांच्या श्वासामुळे

उंचावरी नभी दिसे

आज शहिदांमुळे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational