राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ
मराठ्यांची तू माऊली
स्वाभिमान तुझा बाणा
महाराष्ट्र निर्मीतीचा
जिजाऊचे कष्ट जाणा ||१||
लेक लाडकी जिजाऊ
जाधवांचे कन्यारत्न
भोसल्यांची झाली सून
मनी राज्याचा प्रयत्न ||२||
कर्तृत्वाची शूर गाथा
जिजांऊचे आचरण
स्वराज्याची असे ढाल
प्रेरणांचे उच्चारण ||३|
जिजामाता असे शूर
घडविला पुत्र थोर
गाऊ किती गुणगान
नसे जीवनाला घोर||४||
पराक्रमी शिवबाची
राजमाता तू जिजाऊ
शिकवून राजनिती
शिवबांची झाली आऊ||५||
माँसाहेब शिवराया
स्वराज्याचा मंत्र देती
यश,किर्ती ती उज्वल
स्वप्न साकारून येती ||६||