STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

रक्षाबंधन...!!!

रक्षाबंधन...!!!

1 min
28.4K


ताई आहे तुझी

बस मुकाट्यानं

आज रक्षाबंधन

राखी बांधणार आहे..!


सांग आधी मला

काय ओवाळणी देणार.?

काय काय माझ्या साठी

तू करणार...?


काय तुझा अवतार

घाबरलो बायी

म्हणू कसा मी तुला

आता ताई...!


माझ्या कडे बायी

काही द्यायला नाही

मित्र वाट बघतात

राखी बांध एकदा बायी...!


तुझं दादा हे

नेहमीचंच असतं

मला तुझं नाटक

चांगलंच कळतं...


बैस आता नीट

हात कर पुढे

ओवाळणी राहु देत बाबा

आ कर खा थोडे पेढे


दादा झाला खुश

तायडीचे पेढे खाऊन

ताई झाली खुश

गोड पापा देऊन....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational