STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

राजे शिवाजी

राजे शिवाजी

1 min
204

स्वराज्याचा ज्यांनी

 घडविला विधाता

 धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता 

राजे शिवाजी आपण काय आपली शौर्यगाथा

 पावन केली मराठीमाती टेकवा वाटतो क्षणभर माथा


 संस्काराचे धनी,

 प्रखर अशी वाणी 

मुखात जणू होती आई भवानी  

 

 धडे गिरवत होते शास्त्राचे सोबत शस्त्राचे होते प्रशिक्षण 

ध्यानीमनी स्वराज्याचे स्वप्न मुखी तेज ते विलक्षण  


साहसाची मूर्ती, मावळ्यांची स्फूर्ती राजे आपण मिळवली अपार कीर्ती  

तोफ दणाणले, रंगली लढाई 

घोडदौड, रखरखत्या तलवारी  

पाठीवरती घेऊनी ढाल शौर्याने जिंकला किल्ला तोरणा

 प्रसन्न झाली आई भवानी स्वराज्याचा बांधुन तोरण जागविला मराठी बाणा  

धन्य ती जिजाऊ माई


सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातून 

गुंजला नाद  

सर्वसामान्यांसाठी होते राजे शिवाजी बुलंद आवाज 

अत्याचार सहन करणाऱ्या रयतेने स्वराज्य लढ्यासाठी दिली ज्यांना साद  


शूरवीर मावळ्यांसोबत गडावर गड जिंकले काय भरारी 

घेतली आपण आसमंत भेदणारी 

राजे शिवाजी होणे नाही पुन्हा एकदा या भूवरी 

अन्यायाचे प्रहारक, अफझलखानाचे संहारक गोरगरिबांचा तारक 

राजेशिवाजी आपण

 काय आपली शौर्यगाथा

वंदन करिते तुमच्या चरणी ठेवुनी माथा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational