राधा
राधा
अनुरुक्त कृष्णचरणी ही बाला
कृष्णसख्याची आस तीला
मोहनाची बाधा हिला
अविरत स्वप्नी पाही घनश्यामाला ।।१।।
विनवते बावरी ही मनमोहनाला
नेणीवेची जाणीव नसे जीवाला
अवीट गोडी तव बासुरीला
हरपते मी तनुभानाला ।।२।।
अधरी नित्य नाम जपमाला
नेत्री साठवी हरिरुपाला
जगजेठी हा ह्रदयी बसला
सावळबाधेने देह व्यापला ।।३।।
बेभान जीवाला छंदच जडला
गुज सख्याशी मोहवी मनाला
कालिंदीतीरी जीव गुंतला
बहर येई रासक्रिडेला ।।४।।
चांदण्यातील रम्य सहवासाला
जीव आचवतो सजणभेटीला
हरिस्पर्शाची आतुरता भुलवी चित्ताला
अव्दैताशी नाळ सांधण्याला ।।५।।
वेड लागले राधेला
नावरे मन चित्ताला
काया वाचा मने वाहीला
देह कृष्णमयी जाहला ।।६।।
