प्याला
प्याला
हा दुखाचा प्याला ओसंडुन वाहतो आहे
गौतमा तु तर माणवाला बघतो आहे
वेदनेची चर्च्या हर रस्त्यावर
सुखाची परीभाषाआम्हा ना कळली आहे
गर्क आहेत वासनेत
कुनी पैशाच्या हव्यासात
पाश जिवनाचे ते
सुई प्रमाने टोचते आहे
दु:खाची पातळी तोडण्याचे
मध्यम मार्ग ,तेही पायदळी
मानव तुडवीत आहे
पिंपळ वृक्षाची
ती मोहक सावली
पोटासाठी लोंकानी खुडली आहे
तुझ्या धम्मात केलीत भेसळ
धम्मप्रचाराचे गुंजन थांबले आहे
नुसतिच आहे वैभव,अवंबडर
वेदनाच,आणि ईच्छा ना कुरवाळीत आहे
गौतमा, तुझ्या धम्माची महती थोर
पन आचरतांना माणूस चुकतो आहे
मानवाने कमविली संपत्ती
तरीही मन शांतीविना झुरतो आहे
तुला गौतमा कांचनचे नमन आहे
