STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी

पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी

1 min
188

पुस्तक चिडत नाही की रुसत नाही

माणसां सारखं पाठीत खंजीर खुपसत नाही

चिडवत नाही की फसवत नाही कुणाला

माणसांपेक्षा पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी

वाटलं तर वाचावं नाही तर नाही

मोबदला मागत नाही प्रत्येकवेळी

सोबत करतात , हक्क सांगत नाही

माणसांपेक्षा पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी 

पुस्तक प्रत्येक हाकेला साथ देतात जणू

नाही विचारलं म्हणून कुढत बसत नाही

जगणं शिकवतात , लढणं शिकवतात

माणसांपेक्षा पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी 

पुस्तक भूतकाळाचं दर्शन घडवतात

ते भविष्याचा वेध घेतात आणि

वर्तमान सुकर करण्यास मार्गदर्शक

माणसांपेक्षा पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी 

पुस्तक धोका देत नाही की मोका साधत नाही

सावली बनून सोबत करतात पण अडचण ठरत नाहीत

पुस्तक गुरु मित्र आणि सहकारी ठरतात कधीही

माणसांपेक्षा पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी 

नाहीच माहित त्यांना भेदभाव करणं माणसासारख

तुम्ही कोण कुठले कसे ? गरीब श्रीमंत , बुटके ठेंगणे

कसे वाचता त्याला आणि कुठे कसेही ते राग धरत नाही

माणसांपेक्षा पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी 

पुस्तक पूर्ववैभवाच्या खुणा , उध्वस्त दुःख वेदना

ते इतिहास जुना अन उभारता सुवर्णकाळही अगदी

तेच आपले भाग्याचे संचित , जणू संस्कारी शिल्पकार

माणसांपेक्षा पुस्तकच बरी ... मैत्री निभावतात खरीखुरी

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational