STORYMIRROR

Sunita Ghule

Fantasy

3  

Sunita Ghule

Fantasy

पुस्तक आयुष्याचे

पुस्तक आयुष्याचे

1 min
265

पुस्तक आयुष्याचे बहुरंगी

प्रसंगचित्रानी सजलेले

सुखदुःखाच्या अक्षरांनी

नाट्यमय अंकांनी घडलेले।


अनभिज्ञ प्रत्येक वेळी

पुढच्या पानावरील कथा

काय लिहिले भाग्यात

कुणास ना ठावे व्यथा।


मिळल्या क्षणाचा उपभोग घेत

जगायचे आयुष्य आनंदाने

सजवायचे सप्तसुरानी

आळवायचे सुरेल गाणे।


सार्थक पुस्तकाचे अभ्यासातील

जेव्हा लहानथोर कुतूहलाने

जीणे यशस्वी होईल तेव्हा

स्वार्थावीण समर्पण भावनेने।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy