पुरूषांचे हळदीकुंकू
पुरूषांचे हळदीकुंकू
पुरूषांचा सुद्धा हळदीकुंकवासारखा कार्यक्रम असायला हवा.
पुरूषांनीसुद्धा एकमेकांना भेटायचा कार्यक्रम करायला हवा.
असा कार्यक्रम वर्षातून कमीतकमी दोनदा तरी व्हायलाच हवा.
ज्या पुरूषांच्या बायका जिवंत आहेत त्या पुरूषांना सवाष्ण नवर्याचा मान मिळायला हवा.
पुरूषांना सुद्धा साडीचोळीसारखा पँटशर्टचा मान मिळायला हवा.
या भेटीच्या दिवशी हळदीकुंकवाच्या तबकासारखे
पान तंबाखू विडी सिगारेटीचा तबक पुरूषांत फिरायला हवा.
पुरूषांनीसुद्धा आपल्याकडे हळदीकुंकवासाठी येणार्या
पुरूषांचा क्वार्टरची बाटली देऊन मानसन्मान करायला हवा.
पुरूषांनासुद्धा आपल्या सासुरवाडीतील लोकांची निंदा करायचा
अधिकार कमीतकमी या दिवशी तरी मिळायला हवा.
या दिवशी सासरा आणि जावई पुरूषांच्या हळदीकुंकवात एकत्र फिरायला हवा.
भेटवस्तू म्हणून मिळालेल्या दारुच्या बाटल्यांचा ढिगार व्हायला हवा.
विड्यांचे पुडके, सिगारेटीची पाकिटे, तंबाखूच्या पुड्या यांचा
पुरूषांच्या हळदीकुंकवाच्या दिवशी घरात खच पडायला हवा.
पुरूषसुद्धा त्यांच्या हळदीकुंकवाच्या दिवशी मनात दाटलेले दुःख
वाटून मोकळा मोकळा आणि हलका व्हायला हवा.
पुरूषांनी आपल्या लग्न न झालेल्या मुलांना या हळदीकुंकवात बरोबर न्यायला हवा.
ज्या पुरूषांच्या बायका वारल्या आहेत त्या पुरूषांचे
पुन्हा लग्न व्हावे म्हणून या हळदीकुंकवाचा उपयोग व्हायला हवा.
अशा हळदीकुंकवात पुरूषांना येत असलेल्या पाककलाकृतींच्या
रेसिपींचे आदानप्रदान करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
त्या दिवशी बायकांसारखे निवांत बसून गप्पा मारण्यासाठी पुरूषांकडे सुद्धा वेळ असायला हवा.
पुरूषांनीसुद्धा पुरूषांना निवांत बसायला या असा निरोप द्यायला आणि घ्यायला हवा
