पुन्हा नव्याने
पुन्हा नव्याने
परत एकदा तोच प्रवास, अन् सोबतीला आठवण.
त्याच जोमाने सर करीन, नवीन मिळविण थोडी साठवण.
नवीन काहीतरी मनता, तेच तेच समोर पुन्हा ऊभा.
मनाच्या एकांतात माझ्या, भरवतोय माझी एकट्याची सभा.
बोलतो मीच ऐकतो मीच, आणी पाहतो सुध्दा मीच.
आयुष्य पुढं जात असताना, परिस्थिती थोड़ी सुध्दा हालत नाही टीच.
बदलती फक्त वेळ, बाकी सगळं सारखं असतं.
चमकणाऱ्या दुनियेत, चमकीलाच पाहून माझ मन फसतं.
फसतो तसा खुप वेळा, पण गाफील केव्हाच नसतो.
वेळेसोबत परीस्तीतीत, आधीच फसलेला असतो.
असो सगळं ठीक होईल, सुरवात होईन एक आशेने.
तेच दिवस परत येतील, प्रवास संपून पुन्हा नव्याने.
