पुन्हा नव्याने
पुन्हा नव्याने
आज कित्येक वर्षानी
दैव मेहेरबान झाले
पुन्हा नव्याने तुला
माझ्यासमोर उभे केले
श्वास रोखला माझा
पाहून तुला क्षणभर
शेवटी मनाने समजावले
अग स्वतःला सावर
खूप विचारायचे होते
खूप सांगायचे होते
संसाराच्या रहाटगाड्यात
मन ओढून नेत होते
तू निरोप देत होतास
आठवणींच्या जगाला
दूर क्षितिजाच्या पलीकडे
सूर्य जात होता अस्ताला
