पुन्हा कोरोना
पुन्हा कोरोना
एप्रिल मेचा वाढला ताप
कोरोनाने दिली
दरवाजावर थाप
स्टारवर पुन्हा
सुरू झाले रामायण
जिकडे तिकडे आता
कोरोनाचे पारायण
घराघरात वाजू लागलेत
घंटा आणि शंख
राजकारणी मात्र करत आहेत
एकमेकाच्या नावाने शंख
घराघरात उकळू लागलेत
लवंग दालचिनीचे काढे
कोरोनाचे रूप मात्र
वाढता वाढता वाढे
या कोरोनाचं आता
करायचं तरी काय
मोडायलादेखील त्याला
नाहीत हात पाय
रस्त्यावरती आता होऊ
लागला शुकशुकाट
उन्हाच्या तापाने
जीवाचा तडफडाट
वाफ घ्या, काढा प्या
सल्ले बघा व्हाट्सअपचे
काहीही करा पण आता
जीवाला बघा वाचवायचे
अंतर ठेवा हात धुवा
मास्क नका टाळू
आपला जीव वाचवण्यासाठी
सरकारने केलेले नियम पाळू
