STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

3  

Shital Yadav

Inspirational

पुन्हा जन्माला यावे शिवराय

पुन्हा जन्माला यावे शिवराय

1 min
27K


महाराष्ट्राचे तेजस्वी रत्न, श्रीमंत योगी

सह्याद्रीचे राजे पुन्हा जन्माला यावे

शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला यावे


कडे सह्याद्रीचे लखलखण्यासाठी

राष्ट्रभक्ती आम्हा शिकविण्यासाठी

मनोमनी भगवा फडकविण्यासाठी

अन्यायाने दुःखी कष्टी झाली मानवता

सिंहगर्जना करुन भेदभाव मिटविण्या

सह्याद्रीचे राजे पुन्हा जन्माला यावे

शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला यावे


साधुसंतांचा आदर करण्यासाठी

स्वदेशाभिमान अंगी बाळगण्यासाठी

जिजाऊची शिकवण ऐकविण्यासाठी

माताबहिणीस रक्षिण्या होऊनी पोलादी

मनगटाने संकटातूनी वाचविण्यासाठी

सह्याद्रीचे राजे पुन्हा जन्माला यावे

शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला यावे


मावळ्यांसंगे विटीदांडू खेळण्यासाठी

भग्न किल्ल्यांना आकार देण्यासाठी

मानवतेचा संदेश जगात पोचविण्यासाठी

तुझ्यामुळेच या मातीत घडला इतिहास

चौघडे वाजत पर्वसोनेरी आणण्यासाठी

सह्याद्रीचे राजे पुन्हा जन्माला यावे

शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला यावे


अतोनात जुलमांविरुद्ध झगडण्यासाठी

राष्ट्रातील अफजलचा वध करण्यासाठी

तानाजीची अतूट निष्ठा सांगण्यासाठी

जुलमांशी लढण्या तळपती तलवार

बनून शौर्याने वैऱ्यांना लोळविण्यासाठी

सह्याद्रीचे राजे पुन्हा जन्माला यावे

शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला यावे


शूरवीर मर्द मराठा घडविण्यासाठी

अनाथ प्रजेला मायेचे छत्र देण्यासाठी

आई भवानीला प्रसन्न करण्यासाठी

कडेकपारीतून वाहे झरे राष्ट्रप्रेमाचे

दाहीदिशी कीर्तिचे यशोगान होण्यासाठी

सह्याद्रीचे राजे पुन्हा जन्माला यावे

शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला यावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational