STORYMIRROR

shweta chandankar

Abstract

3  

shweta chandankar

Abstract

पत्र

पत्र

1 min
185

इंटरनेटच्या दशकात आता दिसत नाही

त्या पत्रातल्या आपलेपणाची चाहूल,

नाही दिसत हाताच्या त्या अक्षरांच प्रेम

आणि नाही येत तो प्रेमाचा गंध...


लिहिता लिहिता कधी डोळ्यांतून वाहणाऱ्या

त्या भावनांनी ओले झाले तरी

वाळून परत आधीसारखा होणारा तो कागदाचा कोपरा 

आणि त्यामुळे उगाच पसरलेली शाई...


अन् वाळल्यावरही पडलेल्या अश्रूंच्या थेंबाची

जाणीव होऊ देणारा तो कागद...


म्हणूनच आजही ती पत्रं मनाच्या एका कोपऱ्यात अजुनही तसेच आहेत

एखाद्या दागिन्याप्रमाणे...


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Abstract