प्रेम म्हणते तुला...
प्रेम म्हणते तुला...
कोर जशी शोभते चंद्राला
संगे रातीच्या आसमंताना
गुलाबही लाजला
माझं प्रेम चोरुन तुला सांगताना
त्यानेही उमटवली शाई
जी झडकली मनाच्या कागदावर
ठोठावलं बंद दार
अन आनंदून गेलं आल्यावर
जीवही धडधडला
तुला खरं सांगताना
मी प्रेम म्हणते तुला
माझ्या कवितेत मांडताना...

