मुक्या भावना...
मुक्या भावना...


मुक्या भावनांचे दु:ख माझ्या डोळ्यातून वाहे
ओल्या पापण्याही माझ्या वाट संधीची पाहे
दूर दूर चालला हा मला आवडणारा वारा
कसा गळून पडला माझ्या आयुष्याचा पसारा
लाख प्रयत्न केले पण काही गवसले नाही
या नशिबापुढे काही उमजले नाही
अपयशाच्या गावी आजही सरते माझी रात्र
मी असते बेभान जेव्हा होते माझी सकाळ
कुठे शोधावी आता तिने आयुष्याची बहार
प्रयत्नांच्या नादात सरली तिची दुपार...