STORYMIRROR

shweta chandankar

Others

3  

shweta chandankar

Others

चंद्र...

चंद्र...

1 min
329

चंद्र येतो आकाशात, चांदण्या ही जगमगतात

पण रात्र माझी सरत नाही

विचारांचा तांडव होतो,भाव ही उमलतात

पण हा डाव मी जिंकत नाही

हरते वारंवार जिंकण्याच्या प्रयत्नात 

पण हा खेळ मात्र संपत नाही

रातराणी ही दरवळते,जग ही शांत होतं मग

पण वेळ माझा जात नाही

मी असते झोपेच्या प्रतिक्षेत

पण आता मला वेळेवर झोप येत नाही

भावनांच्या जाळ्यात अडकतो हा मन ही 

पण जाळ्यातुन मात्र निघता येत नाही

रात्र ही सरत असते तिच्या वेळेवर

 पण मी भानावर येत नाही

सरत जाते रात्र ही उजेडाच्या प्रतिक्षेत 

पण आयुष्य मात्र सरत नाही...


Rate this content
Log in