STORYMIRROR

shweta chandankar

Others

3  

shweta chandankar

Others

आयुष्य...

आयुष्य...

1 min
329


शब्दांच्या धुक्यात

आनंदाच्या मुखवट्यात

दु:खाच्या ओझ्यात

काळोख्या अंधारात

निराशेच्या बाकावर

बसून मी माझ्या 

स्वप्नांना जाताना पाहिलंय


अपयश, न्यूनगंड 

छिन्न-विछिन्न अस्तित्वाचे तुकडे

सारं काही अजूनही तसेच बिलगून आहेत 

मला माझ्या सावलीसारखे

एकमेकांत गुंफलेले

भावनात अडकलेले

आठवणीत भरकटलेले

आयुष्याचा हिशोब चुकलेले

कदाचित हेच आयुष्य आहे...


Rate this content
Log in