ती
ती


मी चंद्राला ताऱ्यांशी
आणि ताऱ्यांना चंद्राशी बोलताना पाहिलंय...
मी उन्हाला सावलीशी
आणि सावलीला उन्हाशी बोलताना पाहिलंय...
मी एकटी नसतेच कधी
पण गर्दित हरविलेल्या मला
मी शोधताना पाहिलंय...
माणूस जगतो, अनुभवातून शिकतो
काही नुसतेच बोलतात
पण मी तिला लिहीताना पाहिलंय....
उंचवलेल्या भुवया अन वासनेच्या नजरेतून
स्वत:ला जपता जपता
मी तिला जगताना पाहिलंय..
समाजाच्या खेळात हरता-हरता
मी तिला जिंकताना पाहिलंय...
सुरक्षित म्हणता म्हणता
मी तिला असुरक्षितेच्या जाळ्यात अडकताना पाहिलंय...