वगैरे-वगैरे
वगैरे-वगैरे
1 min
109
भविष्याची चिंता
भुतकाळाची आठवण
वर्तमानाची ओढ
या साऱ्यात आयुष्य किती विस्कटलंय
माणसाने यात स्वत:ला खूप गुरफटून घेतलंय
आणि नेमक जगायचं विसरलाय...
किती सोप्प असतं ना सारं आयुष्य वगैरे
खेळ भातुकलीचा मांडायचा अन् नंतर येतं तुटणं वगैरे
एखाद्या कामात गुंतायचं अन् नंतर येतं नाही जमत वगैरे
प्रेमात पडणं अन् नाही जमायचं वगैरे
आयुष्य असंच असतं
जोडणे-तोडणे वगैरे
भांडण-प्रेम वगैरे
उठणं-पडणं वगैरे
यश-अपयश वगैरे...
