STORYMIRROR

shweta chandankar

Others

3  

shweta chandankar

Others

माझ्या मना...

माझ्या मना...

1 min
289

माझ्या मना जरा थांब ना

पाऊले तुझी रेंगाळती 

त्याच दिशेने का पुन्हा

हरवली ती वाट आता 

का कळेना माझ्या मना


माझ्या मना जरा ऐक ना

शब्द झाले मुके आता

नजर हरवली त्याच दिशेने का पुन्हा

मन माझे हळवे बनुनी

धावते का पुन्हा पुन्हा


माझ्या मना जरा पाह ना

वास्तव्याची दुनीया 

हरवु नको तू आता 

त्या स्वप्नात पुन्हा

हरवलेल्या स्वत:ला शोध आता

रंग हा प्रितीचा उधळु दे आता


माझ्या मना जरा ऐक ना

विसरुनी सगळ ओले चिंब भिज ना

सोड उद्याची चिंता 

आता तरी स्वत:साठी जग ना


Rate this content
Log in