STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

प्रयत्नांती परमेश्वर

प्रयत्नांती परमेश्वर

1 min
1.9K

ईश्वराने मानवाला

दाने अनमोल दिली

दोन हातांच्या सिद्धीस

प्रयत्नांची साथ दिली   (१)


वाळूकण रगडिता

तेल यत्ने मिळतसे

मेहनत कलावंता

मान सन्मान देतसे     (२)


अंध अपंग बधीर

ह्यांचे जीवन बघता

प्रयत्नांची जीवनात

कळे उचित महत्ता    (३)


प्रयत्नांनी शिवबांनी

उभारले साम्राज्यचि

मिळे स्वातंत्र्य देशाला

होता शर्थ प्रयत्नांची    (४)


काळ कठीण ठेपता

धरा कास प्रयत्नांची

माळ गळ्यात यशाची

निश्चितचि विजयश्री     (५) 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract