प्रयत्नान्ति परमेश्वर.
प्रयत्नान्ति परमेश्वर.
जाता प्रयत्न वायाला
नको होऊ तू उदास
नव्या उमेदीने चाल
यश मिळेल हमखास
यश आणि अपयश
जीवनाचे सांगाती हे
पुढेच चालत रहा
हेच गीत गाती ते
निश्चित कर ध्येय तू
केंद्रित लक्ष असू दे
मानू नकोस हार कदापि
प्रयत्नांची पराकाष्ठा होऊ दे
ध्यानी असू दे मुंगीची कथा
भिंत चढताना किती पडली
हिम्मत न हारता तिने
जिद्द नाही कधी सोडली
यश मिळणारच हमखास
धीर तू मना जरासा धर
सांगुनि गेले पूर्वज थोर
प्रयत्नान्ति असे परमेश्वर.
